मुंबई-शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दादरमधील महापौर बंगल्यात स्मारक उभारण्यासाठी १०० कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत घेण्यात आला. स्मारक उभारणीसाठी मुंबई पालिकेकडून स्मारक संस्थेला महापौर बंगल्याची जागा भाडेपट्ट्याने देण्यात आली आहे. दरम्यान आज महापौर बंगल्याचे नाव बदलण्यात आले असून त्याची कागदपत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या जयंती दिनी स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी गणेशपूजन उद्धव ठाकरेंच्या हस्ते करण्यात आले.
भाजपा आणि शिवसेना या दोन मित्र पक्षांचे संबंध कमालीचे ताणले गेले असतांना आज देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे हे दोन नेते एकत्र आले. यावेळी एकदंरीत वातावरण पाहता युतीसाठी सकारात्मक वातावरण दिसून आले.