चंद्रपूर । खासगी बसमध्ये या महिलेवर बलात्कार केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वादात सापडलेले भाजपचे माजी पदाधिकारी रविंद्र बावनथडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून आता त्यांना नागभीडच्या शाळेतून पर्यवेक्षकाच्या पदाहूनही निलंबित करण्यात आले आहे. नागपूरवरुन येणार्या एका आलिशान खासगी बसमध्ये रविंद्र बावनथडे हे एका महिलेशी अश्लील चाळे करत होते. या घटनेचा निषेध म्हणून गडचिरोलीतील इंदिरा गांधी चौकात जिल्हा काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी बावनथडे आणि भाजप सरकारचा निषेध करून भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. महिला काँग्रेसने या घटनेचा जोरदार निषेध व्यक्त केला आहे. भाजप सरकार