शिंदखेडा। तालुक्यातील शिंदखेडा सजाचे तलाठी एस.डी.बाविस्कर यांना 2016/17 चा आदर्श तलाठी पुरस्कार पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते 1 मे महाराष्ट्र दिनानिमिा धुळे येथे प्रमाणपत्र व 9 हजार रूपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. त्यांचे औचित्य साधून शिंदखेडा तहसिल कार्यालय येथे बाविस्कर यांचा सत्कार करण्यात आला.
याआधीही दोनवेळा मिळाला आहे पुरस्कार
तलाठी एस.डी.बाविस्कर यांना थाळनेर ता.शिरपूर येथे असतांना सलग दोन सन 2014-15 व 2015-16 देखील त्यांना गौरविण्यात आले हेाते. तसेच यावर्षी देखील शिंदखेडा येथे कार्यरत असतांना आदर्श तलाठी म्हणून गौरविण्यात आले असून पाष्टे ता.शिंदखेडा येथील गरीब कुटुंबात जन्मलेले आहेत. त्यांनी त्यांच्या कामाचा ठसा उमटविल्याने त्यांचा कामाची पावती मिळाली आहे. त्यांना आदर्श तलाठी पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा शिंदखेडा तलाठी कार्यालयात बांधकाम सभापती शिंदखेडा न.प.उल्हास देशमुख, नगरसेवक निंबा सोनवणे, लोटन पाटील, नेवाड्याचे तलाठी बबलू पवार, मयुर पाटीलसह कार्यकर्त्यांनी सत्कार केला.