बाष्प वाढून फायर अलार्म वाजतो तेव्हा…

0

ड्युनेडिन । दक्षिण आफ्रिकेच्या दुसर्‍या डावादरम्यान सातवे षटक सुरू असताना अचानक युनिव्हर्सिटी ओव्हल स्टेडियमच्या ग्रँडस्टँड येथील आग लागल्याची सूचना देणारा फायर अलार्म वाजल्याने खेळ थांबवण्यात आला. त्या वेळी आफ्रिकेच्या 6.5 षटकांत 1 बाद 14 धावा झाल्या होत्या.

त्यानंतर तातडीने खेळाडूंसह प्रेक्षकांना सुरक्षित स्थळी हलवून मैदान रिकामे करण्यात आले. सुमारे वीस मिनिटे खेळ थांबला होता. या वेळात अग्निशामक दलाने स्टेडियमची कसून पाहणी केली. तथापि, प्रत्यक्षात आग लागली नसल्याचे लक्षात आल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला. ग्रँडस्टँडमधील बाष्पाचे प्रमाण वाढल्यामुळे अलार्म वाजल्याचे अग्निशामक दलाने स्पष्ट केल्यानंतर खेळ पुन्हा सुरू करण्यात आला.