बाहुबली फेम प्रभासच्या ‘राधे श्याम’ चा फर्स्ट लुक जाहीर

0

नवी दिल्ली: ‘बाहुबली’ फेम प्रभास राणाच्या आगामी चित्रपटाबाबत बरीच चर्चा सुरु आहे. चाहते त्याची आतुरतेने वाट पाहत होते. प्रभासच्या आगामी ‘राधे श्याम’ चित्रपटाचा फर्स्ट लूक आज जाहीर करण्यात आला आहे. यात अभिनेत्री पूजा हेगडे प्रभाससोबत आहे. यूवी क्रिएशन्सच्या निर्मितीत तयार झालेल्या या चित्रपटाचे हिंदी वर्जन टी-सिरीज घेऊन येते आहे. फर्स्ट लूक आऊट झाल्यानंतर सोशल मीडियात तो ट्रेंडवर आहे. 2021मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अभिनेत्री पूजा हेगडे आणि प्रभास यांनी चित्रपटाचे पोस्टर आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहे. अभिनेत्री पूजा हेगडे आणि प्रशासनेदेखील सिनेमाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. प्राभसने पोस्टर शेअर करताना लिहिले, ”आशा आहे की माझ्या फॅन्सना हे आवडले.” यापूर्वी प्रभास सोहा सिनेमात श्रद्धा कपूरसोबत दिसला होता.