बाहेरून आलेल्या व्यक्तिंवर पोलीस पाटलाची करडी नजर

0

आरोग्य सेविका करते तपासणी

शिंदखेडा। गावामध्ये कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी ग्रामीण भागात पोलीस पाटील लक्ष ठेवून आहेत. आरोग्य सेविकेंची मदत घेवून तपासणी करण्यात येत आहे.

भारतात कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने बाहेरील राज्यातील तसेच पुणे मुंबई कामानिमित्त महानगरात गेलेले नागरिक ग्रामीण भागात घराकडे येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने मिळेल त्या वाहनाने, पायी पायी आपले गाव गाठत आहेत.यांची नावे व माहिती संकलित करून त्यांना पोलीस पाटील दवाखान्यात पाठवून आरोग्य सेविका यांच्याकडून बाहेरगावाहून आलेल्या तरुणांना होम काॅरंटाईनचा शिक्का मारून त्यांना 14 दिवस घरात थांबण्याची व आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करीत आहे. तसेच चौदा दिवसात काही लक्षण आढळल्यास आरोग्य केंद्राशी संपर्क करण्याचे आवाहन आरोग्य सेविका व पोलीस पाटील यांनी केले आहे. बाहेरगावाहून आलेली मंडळींना होमकाॅरंटाईनचा शिक्का मारल्यानंतर घराबाहेर न निघता आरोग्य विभागाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याची सूचना देण्यात येतात. त्यांना घरात व आपल्या परिवारापासून 14 दिवस दूर राहण्याची सूचना दिली जाते. त्यांनी कुठे गावात फिरू नये याबाबत ग्रामपंचायतीतर्फे जनजागृती करण्यात येत आहे व आरोग्य विभाग प्रशासन पोलिस अधिकारी वेळोवेळीभेट देऊन लोकांना मार्गदर्शन करीत आहे. गावात गर्दी तसेच कायदा व सुव्यवस्था चोख राखण्यासाठी पोलीस पाटील करडी नजर ठेवून आहेत.