रस्त्यात कचरा टाकणार्यांवर आकारणार दंड
वाघोली । वाघोली येथील बीआरटी टर्मिनल स्थानकामध्ये मोठ्याप्रमाणावर कचर्याचे साम्राज्य निर्माण झाले होते. ग्रामपंचायतीकडून याची दखल घेत कचरा उचलण्यात आला आणि त्या ठिकाणी साफसफाई करण्यात आली. त्यामुळे प्रवाशी व नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. केसनंद फाटा येथील बीआरटी स्थानकामध्ये कचर्याचा ढीग साचला होता. या ठिकाणी सातत्याने होत असलेल्या कचर्यामुळे प्रवाशांचे व जवळच्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले होते. दुर्गंधीयुक्त कचर्यामुळे माशा आणि मच्छरांचे प्रमाण वाढले होते. डेंग्यू, मलेरिया, हिवताप आदी आजारांना निमंत्रण मिळत होते. वाघोलीच्या सरपंच वसुंधरा उबाळे, उपसरपंच रामकृष्ण सातव व ग्रा. पं. सदस्य, नागरिक यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेऊन या ठिकाणचा कचरा उचलून साफसफाई केली. स्थानक स्वच्छ झाल्यामुळे प्रवाशांमधून व नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. स्वच्छतेला प्राधान्य दिले जाणार असून दर गुरुवारी स्वच्छता मोहीम राबवली जाणार असल्याचे सरपंच वसुंधरा उबाळे यांनी सांगितले.
दंड आकारणार
उबाळे नगरजवळ पुणे-नगर महामार्गालगत मोठ्याप्रमाणावर असणारा कचर्याचा ढीग गेल्या गुरुवारी उचलून स्वच्छ करण्यात आला होता. परंतु तीन दिवसांनी त्या ठिकाणी पुन्हा मोठ्याप्रमाणात कचरा टाकण्यात आला. वाहनांमधून हा कचरा रात्रीच्यावेळी आणून टाकला जातो. भर रस्त्यात कचरा टाकणार्यांना दंड आकाराला जाईल आणि कचरा टाकणार्यांची माहिती देणार्या व्यक्तीला बक्षीस देण्यात येईल
– रामकृष्ण सातव, उपसरपंच, वाघोली