बिग बॉस घेऊन येत आहे नवीन सीजन

0

मुंबई: ‘बिग बॉस’ आता पुन्हा नवीन सीजन घेऊन येत आहे. या नव्या पर्वामध्ये कोणकोणते कलाकार झळकणार याविषयी उत्सुकता आहे. विशेष म्हणजे यावेळी नवविवाहित दाम्पत्य मिलिंद सोमण आणि अंकिता कोनवार झळकणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र या चर्चांना मिलिंदने पूर्णविराम दिल्याचं पाहायला मिळत आहे.

‘बिग बॉस’च्या १२ व्या सीजनच आतापर्यंत दोन प्रोमो प्रदर्शित झाले आहेत. या शोमध्ये २१ स्पर्धकांचा समावेश करण्यात येणार असून त्यातील ३ जोड्या या सेलिब्रेटींच्या असतील तर ३ जोड्या सामान्य नागरिकांपैकी निवडण्यात येतील. त्यामुळे या सेलिब्रेटींच्या जोडीमध्ये मिलिंद आणि अंकिता यांच्या नावाची चर्चा सुरु होती. मात्र मला बिग बॉसविषयी कोणतीही विचारणा करण्यात न आल्याचं त्यामुळे आम्ही या स्पर्धेचा भाग होणार नाही असा मिलिंदने स्पष्ट केलेले आहे.