मुंबई : बिग बॉस मराठीचा उपविजेता पुष्कर जोगचा नवा म्यूझिक व्हिडिओ रिलीझ झाला आहे. ‘झिल मिल’ असे या गाण्याचे नाव आहे. पुष्कर जोग अभिनयासोबत त्याच्या डान्सस्टाईलसाठीही फेमस आहे. हे गाणं ऑस्ट्रेलिया येथे शूट करण्यात आले आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक सलिम मर्चंट यांनी हे गाणं गायले आहे.