‘बिग बॉस-12’ची विजेती दीपिका कक्कर

0

मुंबई : कॉंट्रोव्हर्शिअल शो ‘बिग बॉस 12’चा विजेता कोण होणार याची उत्सुकता संपूर्ण देशभरात होती. टीव्हीची लाडकी सीमर म्हणजेच दीपिका कक्कर ‘बिग बॉस-12’ची विजेती ठरली. तर माजी क्रिकेटपटू श्रीशांत सिझनचा उपविजेता ठरला.

दीपिकाचा जन्म ६ ऑगस्ट १९८६ ला पुण्यामध्ये झाला. तर मुंबईत तिने आपले शिक्षण पूर्ण केले. २०१० मध्ये तिने ‘नीर भरे तेरे नैना देवी’ यातून टीव्हीवर पदार्पण केले. याशिवाय ती जेपी दत्ता यांच्या ‘पलटन’ चित्रपटातही झळकली आहे. दीपिका याच वर्षी फेब्रुवारीमध्ये शोएब इब्राहिमसोबत विवाहबंधनात अडकली.