बिजलीनगरमध्ये गणपतीला 300 किलो भरीताचा नैवेद्य

0

पिंपरी चिंचवड ः बिजलीनगर येथे गणपतीला 300 किलो भरीताचा नैवेद्य दाखविण्यात आला. कैलास पाटील यांनी चक्क 300 किलो भरीताचा नैवेद्य गणपतीला दाखविला. सोमवारी याठिकाणी सत्यनारायणाची पूजा ठेवण्यात आली होती. प्रसाद म्हणून सुनसगाव (जि.जळगाव) येथील कैलास पाटील यांनी हा नैवेद्य दिला. या उपक्रमासाठी किशोर पाटील, विजय पाटील, विलास कोल्हे, प्रमोद पाटील, संदीप पाटील, योगेश पाटील, पंकज पाचपांडे, आश्‍विन पाटील, गजानन बोरोले, अविनाश खर्चे, योगेश गजरे, प्रफुल्ल बोरले, किरण वगुलादे, भरत उन्हाळे, मिलिंद धांडे यांनी या उपक्रमासाठी सहकार्य केले.