बिजलीनगरमध्ये पाककलेच्या स्पर्धेत लेवाशक्ती सखी मंचच्या महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0

स्पर्धेमध्ये वैविध्यपूर्ण व सजवलेल्या पदार्थांची मेजवानी

पिंपरी-चिंचवड । लेवाशक्ति सखी मंचने बिजलीनगर येथील महिलांसाठी पाककलेची स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये महिलांनी वैविध्यपूर्ण व सजवून पदार्थ बनवले होते. उकडीचे मोदक, लाडू, बर्फी, खीर, खमंग ढोकळा, भजी, मुगाचे थालीपीठ असे सजावट करून अनेक विविध पदार्थ बनविण्यात आले होते. यामध्ये वृषाली पाचपांडे, अपर्णा पाटील, भारती ढाके, सोनाली रोटे, निशा ढाके, मंजूषा राणे, मिनल फेगडे, निकीता येवले, सुजाता झांबरे, मनिषा पाटील, सविता खाचणे, जयश्री महाजन, सरला गाजरे, निकीता चिनावले, रोहिणी नारखेडे, कोमल पाटील, किर्ती ढाके, सीमा ढाके, जयश्री पाटील, ज्योती किनगे, रोहिणी पाचपांडे, ललीता झांबरे, हर्षा पाचपांडे यांनी पाककला स्पर्धेत सहभाग नोंदविला.

स्पर्धांतून महिलांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहित करावे
या कार्यक्रमाचे आयोजन लेवाशक्ति सखी मंचच्या रेखा भोळे, विभावरी इंगळे, गौरी सरोदे, किरण पाचपांडे, चारुलता चौधरी यांनी ज्योती ढाके यांच्या निवासस्थानी केले होते. यावेळी कांचन ढाके, शीतल नारखेडे व पूनम झांबरे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी बुलढाण्यावरून आलेल्या कुंदा पाटील, तर संध्या सुधाकर महाजन हे परीक्षक होते. यावेळी कुंदा पाटील म्हणाल्या लेवाशक्ति सखी मंचद्वारा आयोजित पाककला स्पर्धा अतिशय सुरेख पार पडली. सर्व लेवा भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. अशाच पद्धतीने लेवा भगिनींनी सामूहिकरित्या एकत्रित येऊन वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून महिलांमधील सुप्त कलागुणांना प्रोत्साहित करावे. जेणेकरुन महिलांमधील आत्मविश्‍वास वाढेल.

महिलांसाठी विविध योजना आणू
यावेळी संध्या महाजन म्हणाल्या आजची स्पर्धा म्हणजे आमची लेवा भगिनी किती पौष्टिक पदार्थ बनवू शकते याचे उत्तम उदाहरण. या स्पर्धांमध्ये महिलांनी अशीच साथ दिली तर त्यांच्यासाठी आपण विविध योजना आणू शकतो.

महिलांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळवून देऊ
प्रत्येक महिलेला स्वतःच्या पायावर उभे करुन त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळू शकतो. महिलेचे एकत्रिकरण असणे हे फार महत्त्वाचे आहे, असे लेवाशक्ति सखी मंचच्या रेखा भोळे म्हणाल्या.