प्राधिकरणाने नागरिकांच्या भावना भडकावू नये
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड प्राधिकरणाच्या अतिक्रमण विभागाकडून डिसेंबर 2018 च्या अखेरीस बिजलीनगर, चिंचवडेनगर येथील गणेश मंदिर, तुळजाभवानी मंदिरे तसेच साई मंदिर अशा चार मंदिरांवर कारवाई करण्यात येणार आहे. परंतु सदरची कारवाई ही प्रशासन दुजाभाव करून करत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. अशा पक्षपाती कारवाईमुळे हजारो हिंदू धर्मियांची मने दुखावली जाणार असल्याने स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
15 वर्षांपासून धार्मिक आस्थापणाची केंद्रे
हे देखील वाचा
गेल्या 15 वर्षांपासून या मंदिरांवर अनेक भाविकांची श्रद्धा आहे. प्राधिकरण हद्दीतील सेक्टर 29 ते 33 अशा पाच क्षेत्रामध्ये 24 अनधिकृत धार्मिक स्थळे सध्या अस्तित्वात आहेत. त्यामध्ये हिंदू मंदिरे, मज्जीद, बुद्ध विहार, चर्च अशाप्रकारे सर्व धर्मियांची धार्मिक स्थळे उभी आहेत. अशाप्रकारे सर्व धर्मीय धार्मिक कार्यक्रम गुण्या गोविंदाने गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी साजरे करतात. चिंचवड परिसरातील रावेत, वाल्हेकरवाडी, बिजलीनगर, चिंचवडेनगर, गुरुद्वारा परिसरामध्ये 80 हजार पेक्षा जास्त नागरिक शांतता व सौहादर्याच्या वातावरणात सध्या राहत आहेत. या 24 अनधिकृत धार्मिक स्थळांना प्राधिकरणाने ब निष्काशीत श्रेणीत वर्गीलेले आहे. त्यापैकी 20 धार्मिक स्थळांवर तूर्तास कारवाई टळली आहे. परंतु बिजलीनगर – चिंचवडेनगर येथील हिंदू मंदिरांवर हातोडा पडणार आहे. सदरची मंदिरे 15 वर्षांपासून धार्मिक आस्थापणाची केंद्रे असून लोकांची आस्था या मंदिरांशी जोडली गेली आहे, त्यामुळे ही मंदिरे तोडण्याचा अट्टहास का? असा सवालही स्थानिकांनी उपस्थित केला आहे. स्थानिक रहिवाशांनी या कारवाई विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून पुन्हा धार्मिक वातावरण ढवळून निघणार यात शंका नाही.
128 मंदिरांपैकी 124 मंदिरे नियमित
स्थानिक लोकप्रतिनिधी, रहिवाशी यांची तुळजाभवानी मंदिरात नुकतीच बैठक घेण्यात आली. स्थानिक नगरसेवकांवर कारवाई न होणेकरिता नागरिकांचा दबाव वाढण्याची दाट शक्यता आहे. नागरिकांचे म्हणणे ही रास्तच आहे. शहरातील 128 मंदिरांपैकी 124 मंदिरे नियमित झालेली असून या परिसरातील धार्मिक स्थळे नियमित का होत नाहीत? सदर मंदिराच्या जागा कुठल्याही प्रकल्पाच्या, किंवा आरक्षणाच्या नसून सर्व मंदिरे निवासी – रहिवाशी झोनमध्ये आहेत. तसेच बिजलीनगरमधील गणेश मंदिर तर सन 2003 पासून असल्याकारणाने सदरच्या मंदिरावर कारवाई नियमबाह्य ठरते. गणेश मंदिरामुळेच बिजलीनगर शिवनगरी परिसरास एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. अश्या मंदिरावर कारवाई होणे घटनांबाह्यच ठरते, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.