बिजिंगमध्ये चांद्र मोहिमेची तयारी

0

बिजींग – चंद्रावर यानात गेल्यावर केंद्र मानवी जीवन कसे अबाधित ठेवता येईल. तिथे कसे काय वाटते. कोणत्या समस्या येतात. हे पाहण्यासाठी चीनमध्ये बिजिंगच्या उपनगरात लुनार पॅलेस १ या यानात अंतराळवीर २०० दिवसांसाठी गेले आहेत.

६० दिवसासाठी गेलेले संशोधक लुनार पॅलेस मधून बाहेर आले. आता चार विद्यार्थी चांद्र यान लुनार पॅलेस १ मध्ये प्रवेशकर्ते झाले. त्यात ते २०० दिवस राहणार आहेत. त्यांना गिनीपिग बनण्याबद्दल काहीही वाटत नाही कारण त्यांना अंतराळवीर बनायचे आहे. त्यातील ली ग्वांघुई म्हणतो हे जीवन वेगळंच आहे.

चीनचे अध्यक्ष झी जिनपिंग यांना चीनने अंतराळ संशोधनातही चीने जागतिक महासत्ता बनावे असे वाटत आहे. २०१८ पर्यंत चंद्राच्या अंधाऱ्या भागावर संशोधन करण्याचे उद्दीष्ट चीनने ठेवले आहे. २०३६ पर्यंत चंद्रावर अंराळवीर पाठवायचा संकल्प चीनने केला आहे. प्राध्यापक ल्यू हाँग चीनच्या चांद्र प्रकल्पाच्या प्रमुख आहेत. यानात मानवी जीवन अंतराळातही कसे तग धरील याचा हिशेब करण्यात आला आहे. अंतराळ स्टेशन मधील वनस्पतींपासून निर्माण होणारा ऑक्सिजन माणसांना पुरेसा ठरेल. छोट्याशा जागेत दीर्घकाल रहाण्याचा मानसिक परीणामही या प्रकल्पात अभ्यासला जात आहे, हाँग सांगतात. सूर्य प्रकाशाशिवाय ते कसे राहतात हे आता पहावयाचे आहे, असेही त्या म्हणाल्या.