बिडगाव शिवारात विहिरीत बुडून एकाचा मृत्यू

0

अडावद। तालुक्यातील बिडगाव येथील शेत शिवारात शेतातील मजूरांसाठी पाणी आणण्यासाठी विहीरी जवळ गेलेल्या एका 55 वर्षीय इसमाचा पाय घसरून तोल गेल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार येथून जवळच असलेल्या बिडगाव ता. चोपडा शिवारात गोकुळ रघुनाथ पाटील (वय 55, रा.चुंचाळे ह.मु.बिडगाव ता.यावल) यांनी आपल्या शेतातील कामाच्या निमित्ताने मजूर कामाला लावले होते. त्यांना पिण्यासाठी पाणी आणण्यासाठी शेतातील विहिरीजवळ गेल्यानंतर 24 रोजी सकाळी 9.15 वाजेच्या सुमारास त्यांचा पाय घसरल्याने तोल जाऊन विहिरीत पडून बुडून मृत्यू झाला. रावसाहेब पाटील यांच्या खबरीवरून अडावद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केले.