‘बिदाई’ फेम पारुलही लग्नबेडीत अडकली

0

मुंबई : सध्या लग्नाचा सीजन सुरु आहे. बॉलीवूड असो किव्वा टीव्ही एका मागे एक सेलेब्रिटी लग्न करत आहेत. सोशल मीडियावरही सेलिब्रिटींच्या विवाहसोहळ्याचे फोटो, व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत. टेलिव्हिजन अभिनेत्री पारुल चौहान हिनेसुद्धा लग्नगाठ बांधली आहे. बुधवारी १२ डिसेंबर रोजी मुंबईतल्या इस्कॉन मंदिरात पारुल प्रियकर चिराग ठक्करसोबत लग्नबंधनात अडकली.

स्टार प्लस वाहिनीवरील ‘बिदाई’ या मालिकेतून पारुलने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. या मालिकेमुळेच ती घराघरात पोहोचली. सध्या ती ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत सुवर्णा ही भूमिका साकारत आहे.