बिपिन रावत यांनी घेतली शहिदाच्या कुटुंबाची भेट!

0

जम्मू । लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी दहशतवाद्यांकडून मारले गेलेले जवान औरंगजेब यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. शिवसेनेनेही असे औरंगजेब घराघरांत जन्माला यावेत, अशा शब्दांत शहीद जवान औरंगजेब यांच्या कार्याचा सन्मान केला आहे. जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यातील शहीद औरंगजेब यांच्या घरी जाऊन रावत यांनी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

औरंगजेब हे लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्सचे जवान होते. ईद साजरा करण्यासाठी सुटी घेऊन ते घरी निघाले होते. त्यावेळी दहशतवाद्यांनी पुलवामा येथून त्यांचे अपहरण केले होते. त्यानंतर औरंगजेब यांचा मृतदेह आढळून आला होता. शहीद जवान औरंगजेबच्या यांच्या वडिलांनी सरकारला सात दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.