बिप्लब यांनी घेतली त्रिपुराच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

0

अगरतळा : त्रिपुरा विधानसभा निवडणुकांमध्ये कम्युनिस्ट पक्षा पराभव करून विजयी झालेल्या भारतीय जनता पक्षाने शुक्रवारी त्रिपुरामध्ये सत्तास्थापन केली. त्रिपुरा भाजपचे प्रदेशाध्यक्ष बिप्लब कुमार देब यांनी अगरतळा येथे मुख्यमंत्रिपदाची तसेच गोपनीयतेची शपथ घेतली. विशेष म्हणजे, त्रिपुरा राज्याच्या स्थापनेनंतरच्या 55 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच राज्यात भाजप सरकार सत्तेत आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्यासह अनेक नेते व नागरिक या सोहळ्याला उपस्थित होते. त्रिपुराचे राज्यपाल तथागत देवराय यांनी सर्वप्रथम देब यांना मुख्यमंत्रिपदाची तसेच गोपनीयतेची शपथ दिली. यानंतर जिष्णू देबराम यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर आणखीन सात नेत्यांनीदेखील यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतली.