बिबट्याचा अधिवास असलेल्या क्षेत्रात सावधानी बाळगावी

0

चाळीसगाव । गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यातील पिलखोड, तामसवाडी, उंबरखेड, सायगाव आदी भागात बिबट्याने धुमाकुळ घातला असून उंबरखेड येथील महिला व बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू होऊन परीसरात नेहमीच बिबट्याचे दर्शन होत असल्याने परीसरात भितीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने पिंजरा लावून देखील बिबट्या सापडत नसल्याने वनविभाग देखील परेशान झाला आहे, अशा परीस्थितीत नागरीकांनी बिबट्याच्या आधिवास क्षेत्रात सावधगिरीने कसे वागावे व त्याबाबत काळजी कशी घ्यावी याबाबत आवाहन केले आहे.

बिबट्या दिसून येत असल्याने भितीदारक वातावरण
ज्या परीसरात बिबट्या दिसल्यास त्याच्याजवळ जावू नये, त्याचा पाठलाग न करता मागे फिरावे, बिबट्याच्या प्रवन क्षेत्रात अंधाराच्या वेळी मुलांना एकटे सोडू नये. अंधारात एकटे फिरतांना व शौचास जातांना, शेतात पाणी भरण्यासाठी जातांना मोठ्याने गाणे म्हणावेत अथवा मोबाईलचा मोठा आवाज करावा, रात्रीच्यावेळी सोबत कंदील, बॅटरीसह दणगट काठी, शीट्टी सोबत ठेवून ठराविक अंतराने मोठ्याने वाजवावी. कुत्र्याला सोबत घेवून त्यांच्या मानेला काटेरी पट्टा बांधावा. गुरांना बंदिस्त गोठ्यात ठेवावे, रात्री गोठ्यात उजेडाचा लाईट लावावा, गावात स्वच्छता ठेवून मोकाट कुत्रे व डुकरे यांची संख्या कमी कशी होईल यांचा काळजी घेऊन सापळा लावल्यापासून परावृत्त करा. सापळ्यात अडकलेला बिबट्या अधिक धोकादायक बनू शकतो. बिबट्या दिसल्यास गावात दवंडी देवून त्या ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन वनपरीक्षेत्र अधिकारी संजय मोरे यांनी केले असून याबाबत वनविभागाचे मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे (9822604055), घोडेगाव वनरक्षक चव्हाण (9209861240), जुन पाणी वनरक्षक जाधव (9764418437), उपखेड वनरक्षक पाटील (9823615097), शिवरे वनरक्षक पाटील (9420214241) यांच्यासह वनविभागाचा टोलफ्री 1926 क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मंत्र्यांना निवेदन
वन्य प्राण्याच्या मुक्तसंचारामुळे भितीदारक वातावरण असून वारंवार वनविभागाला सुचना करुन ही त्रांनी ठोस कारवाई केलेली नाही. अद्यापही बिबट्यांचे मुक्त संचार दिसून येत आहे. वन्य प्राण्यांवर निर्बध घालावे यामागणीचे निवेदन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना राष्ट्रवादी कॉग्रेसचे जि.प.सदस्य भूषण पाटील यांनी निवेदन पाठविले आहे