चाळीसगाव । तालुक्यातील उपखेड येथे बिबट्याने पुन्हा 38 वर्षीय महिलेवर हल्ला केल्याची घटना आज दुपारी 3.30 वाजता घडली असून उपचारासाठी चाळीसगाव येथे रवाना करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील उपखेड येथील शेत शिवारात गायत्री सुरेश पाटील (वय-38) शेतात कपाशी वेचत असतांना दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास अचानकपणे बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात गायत्री यांच्या मानेला व हातावर बिबट्याने चावा चावा घेऊन जखमी केले असून उपचारार्थ चाळीसगाव येथील देवरे हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच तालुका प्रशासनाने धाव घेतली असून वनविभागाचे पथकही त्या परीसरात रवाना झाले आहे. दरम्यान सकाळी बिबट्याने एक गायीचे पिल्लू खाल्ले असल्याचे समजते.