बिबट्याची दहशत कायम : चार गायींसह दोन बछड्यांचा फडशा

0

चाळीसगाव तालुक्यातील भऊर शिवारातील घटना ; बंदोबस्ताची मागणी

चाळीसगाव- तालुक्यात बिबट्याची दहशत कायम असून त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. भऊर शिवारात एका शेडमधील चार गायी आणि दोन बछड्यांचा फडशा पाडल्याची घटना रविवारी रात्री उघडकीस आली. ग्रामस्थांमध्ये या प्रकाराने प्रचंड भीती पसरली आहे. भऊर शिवारातील शहासिंग जयसिंग पाटील यांच्या शेतामधील गुरांच्या शेडमध्ये बांधलेल्या चार गायी व दोन बछडे यांच्यावर हल्ला करून बिबटयाने त्यांना ठार केले. यातील काही जनावरांना त्याने खाल्ल्याचे निदर्शनास आले. याबाबत पाटील यांनी या घटनेची माहिती वनविभागाकडे दिली असता वनविभागाच्या अधिकाजयांनी 8 रोजी दुपारी घटनास्थळी जावून पंचनामा केला. वनविभागाकडून या भागात पिंजरा लावण्यावर भर दिला जात आहे.