In Tarhadi Shivar, The Leopard Killed The Goat With The Cow शिरपूर : तालुक्यातील तर्हाडी शिवारातील तापी नदी किनार्यावर बिबट्याची दिशा कायम असून शनिवारी पहाटे गायीचा फडशा पाडल्यानंतर दुपारी बकर्यांच्या कळपावर हल्ला केल्याने एका बकरीचा फडशा पाडण्यात आला. या प्रकाराने शेतकर्यांमध्ये भीती पसरली असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
आतापर्यंत अनेक प्राण्यांचा बळी
शिरपूर तालुक्यात गेल्या दोन-अडीच वर्षांपासून तापी नदी काठावरील थाळनेर,मांजरोद,टेकवाडे, उंटावद, खर्दे, अंतुर्ली, तर्हाडी आदी भागात बिबट्याचे वास्तव्य आढळून आले असून अनेक पाळीव प्राण्यासह जंगली प्राण्यांचा जीव घेतला आहे मात्र एकाच दिवशी दोन पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याची घटना तालुक्यातील तर्हाडी येथे घडल्याने शेतकर्यांसह नागरीकामध्ये भीती पसरली आहे.
बिबट्याला प्रत्यक्ष पाहिल्याचा दावा
तालुक्यात आतापर्यंत फक्त पायांच्या ठश्यावरून वास्तव्य असल्याचे समोर आले होते मात्र बकर्या चारणार्या व आणि स्वतःच्या बकरीचा बिबट्याने फडशा पडलेल्या तर्हाडी येथील रहिवासी भीमराव चुडामणन याने बिबट्याला बकरी ओढून नेताना पाहिल्याचा दावा केल्याने व परिसरात आणि घटनास्थळी बिबट्याचेच ठसे आढळून आल्याने शेतकरी शेतमजूर आणि ग्रामस्थ भयभीत झाले आहेत त्यामुळे वनविभागाने सापळा रचून उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.