बुलढाण्यातील शिकारीबाबत आरोपींची संदिग्ध माहिती ; पाच दिवसांच्या कोठडीनंतर आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी
भुसावळ- शहरातील जामनेर रोडवर गत बुधवारी बिबट्याच्या कातडीची विक्री करण्यासाठी आलेल्या चौघांच्या वनविभागाने मुसक्या आवळल्या होत्या. आरोपींनी बिबट्याची शिकार केव्हा व कुठे केली ? याबाबत पाच दिवसाही माहिती बाहेर आली नाही तर या घटनेनंतर मुंबईतील वाईल्ड क्राईम कंट्रोल ब्युरोचे निरीक्षक बी.एस.काठी व निरीक्षक डी.एस.मलाह यांनी आरोपींची चौकशी केली. आरोपींच्या भ्रमणध्वनीवरून आरोपींनी प्राथमिकरीत्या बुलढाणा जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी शिकार केल्याची माहिती दिली होती.
आठवड्यातून एक हजेरी लावण्याचे आदेश
आरोपींनी कधी बिबट्या विहिरीत पडल्याचे तर कधी त्याला करंट देऊन ठार दिल्याचे सांगितल्याचे पी.टी.वराडे म्हणाले. वनविभागाने सापळा रचून आरोपींशी 30 लाखात बिबट्याच्या कातडीचा सौदा ठरवला होता तर या प्रकरणी सुरेश गजानन झाल्टे (बोरखेडा, ता.बुलढाणा), कृष्णकुमार अमरसिंग बेग (बर्हाणपूर, मध्यप्रदेश), दिलीप अमरसिंग बेग (बर्हाणपूर, मध्यप्रदेश), नंदकिशोर रामचंद्र खवळे (अमळनेर, ता.जळगाव) यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, आरोपींची सोमवारी पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. दर आठवड्यातून एका एकदा आरोपींना वनविभागाच्या कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे.