वरखेडे ग्रामस्थांसह वन विभागाच्या अनास्थेबद्दल ठिय्या
चाळीसगाव । तालुक्यातील गिरणा परिसरात नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र अद्यापपावेतो सुरु असून काल तालुक्यातील वरखेडे येथील दिपाली जगताप हीचा काल बिबट्याने केलेल्या हल्ल्यात बळी गेला, मागील दोन महीन्यात बिबट्याने तीन लोकांचा निष्पाप बळी घेतला होता तरी देखील प्रशासनाने कुठलीही उपाययोजना केलेली नव्हती, शेतात कापूस वेचणीचे काम करत असलेल्या महीलेवर बिबट्याने हल्ला चढवला, झालेल्या तीव्र हल्ल्यात दिपाली जगताप यांचा अवघ्या काही क्षणातच मृत्यू ओढवला
आज सकाळी नातेवाईकांनी ग्रामस्थांसह तहसिल आवारात मृतदेह आणून ठेवला जोवर नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यात येत नाही तोवर मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही अशा संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्यात त्यात महाराष्ट्र विद्युत वितरण महामंडळाने लागू केलेली लोडशेडींग संदर्भात देखील तक्रार करण्यात आली यावेळी प्रांताधिकारी शरद पवार, पो.नि. रामेश्वर गाडे पाटील, वनाधिकारी एस.एस.मोरे यांच्यासमोर वनविभाग, आरोग्य विभाग तसेच वीज मंडळाच्या अनास्थेबद्दल तक्रारींचा पाढा वाचण्यात आला. प्रांताधिकारी शरद पवार तसेच पदाधिकार्यांनी उप वनसंरक्षक आदर्श रेड्डी यांच्याशी दुरध्वनीद्वारे चर्चा करण्यात आली. नरभक्षक बिबट्या संदर्भात वनविभागाच्या वतीने तात्काळ उपाययोजना करण्यात येतील असे सांगण्यात आले. परिसरात 7 पिंजरे,ड्रोन कॅमेर्याची व्यवस्था तसेच कर्मचार्यांची कुमक वाढवण्यात येणार असल्याचे आदर्श रेड्डी यांनी सांगितले.
तहसील आवारात यांची उपस्थिती
माजी आमदार राजीवदादा देशमुख यांच्यासह तालुक्यातील अनेक पक्षाच्या पदाधिकारींनी शासनास जाब विचारला. यावेळी प्रमोद पाटील, शशिकांत साळुंखे, दिनेश पाटील, रमेश चव्हाण, रामचंद्र जाधव, भगवान पाटील, दिपक पाटील, अॅड.रोहिदास पाटील, अजय पाटील, अनिल निकम, महेंद्र पाटील, यशवंत पाटील, सुभाष जैन, सुर्यकांत ठाकूर, पिनल पवार, भैयासाहेब पाटील, काशिनाथ गायकवाड, फकीरा मिर्झा, रियाज शेख, जगदीश चौधरी, संजय ठाकरे तसेच गिरणा परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.