बिबट्याने पाडला गायीसह वासराचा फडशा

0

साक्री । साक्री तालुक्यातील वसमार येथील शेतातील गुरांच्या वाड्यावर पहाटेच्या सुमारास बिबट्याने गायीसह वासराचा फडशा पाडल्याची घटना घडली असून परीसरातील शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार वसमार येथील शेतकरी यशवंता गुलाब नेरे यांच्या धमनार शिवारात शेत असून काल पहाटेच्या सुमारास गुरांच्या वाड्यावर बिबट्याने हल्ला करून गायीसह वासराचा फडशा पाडल्याचे समोर आहे. ही घटना शेतकरी यांना शेतात आल्यानंतर लक्षात आली. या घटनेची माहिती शेतकरी यशवंत नेरे यांनी वनविभागाला दिली. त्यावरून घटनेचा पंचनामावनपाल वर्षा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक एस.बी.पगारे व वनमजुर रमेश बच्छाव यांनी केला. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व शेतमजुर वर्गात भितीच वातावरण निर्माण झाले आहे.