बिबट्याला दिसताच क्षणी गोळी घालून ठार मारण्याचे आदेश

0
 चाळीसगाव- नरभक्षक बिबट्याने तब्बल पाच जणांचा बळी घेतल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी सुसाबाई धना नाईक (55) यांचा मृतदेह सोमवारी सकाळी चाळीसगाव पोलीस ठाण्याच्या आणल्याने खळबळ उडाली होती. या प्रकाराची गंभीर दखल घेत आमदार उन्मेश पाटील यांनी वनविभागाचे राज्याचे प्रधान सचिव विकास खर्गे यांच्याशी तब्बल 20 मिनिटे संवाद साधत संपूर्ण परिस्थितीची कल्पना दिल्यानंतर खर्गे यांनी बिबट्याला ठार मारण्याचे तोंडी आदेश दिले. दरम्यान, डीएफओ साळुंखे यांची आमदारांनी चांगलीच झपाई करीत त्यांना फैलावरही घेतले. दहा बाय दहाच्या खोलीत बसून आम्हाला आता आश्‍वासन नको तर प्रत्यक्षात कृती हवी आहे. पाच लोकांचे बळी गेले असून तुम्ही कारवाई करत नसाल तर मी स्वतः रस्त्यावर उतरतो व मी आमदार आहे तेव्हा विसरून जाईल, अशा शब्दात त्यांनी साळुंखे यांची झपाई केली.
प्रधान सचिवांच्या आदेशानंतर मृतदेह हलवला
शासकीय विश्रामगृहात आमदारांनी राज्याचे प्रधान सचिव किसान खर्गे यांच्याशी तब्बल 20 मिनिटे इंग्रजीत संभाषण साधून घडलेल्या प्रकाराची माहिती दिल्यानंतर खर्गे यांनी बिबट्याला ठार मारण्याचे तोंडी आदेश दिले. त्यानंतर आमदारांनी पोलीस ठाणे गाठून मयत सुसाबाई नाईक यांच्या नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर मृतदेह हलवण्यात आला.