बिबट्याला पकडल्याची बातमी ठरली ‘अफवाच’

0

चाळीसगाव । तीन महिन्यात तब्बल चार जणांचा बळी घेणारा बिबट्या तालुक्यातील तिरपोळे येथील नाल्याकाठी असल्याची पक्की बातमी मिळताच वनविभागाला सापळा रचला मात्र घनदाट झाडा-झुडूपांमुळे व घटनास्थळी होत असलेल्या नागरीकांच्या ओरडण्यामुळे बिबट्या निसटला तर बिबट्याला मात्र जेरबंद करण्यात आल्याची वार्ता केवळ अफवा ठरली.

बिबट्याचा ड्रोनद्वारे शोध
बिबट्याला बंदीस्त करण्यासाठी वनविभागाने ड्रोनचा वापर सुरू केला आहे. जिथे-जिथे बिबट्या आढळत आहे तेथे वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी धावून खातरजमा करीत आहेत तर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी ट्रन्क्यूलायझर गन (बेशूद्ध करणारी बंदूक) वनविभागाला प्राप्त झाली आहे.

सापळ्यातून निसटला बिबट्या

शुक्रवारी दुपारी तिरपोळे गावाजवळील नाल्यात बिबट्या असल्याची बातमी कळताच चाळीसगाव वनपरीक्षेत्राचे अधिकारी एस.एस.मोरे, जळगावचे मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे, शार्ट सुटर व वनरक्षक गणेश गवळी, वन्यजीव अभ्यासक विवेक देसाई, पाचोरा, पारोळा व चाळीसगाव वनक्षेत्रातील कर्मचार्‍यांसह जळगाव फिरत्या गस्ती पथकाचे अधिकारी व कर्मचारी धावले मात्र नाल्याकाठी प्रचंड झाडे-झुडूपे असल्याने सापळ्यात बिबट्या अडकला नाही तर प्रचंड जमावही जमा झाल्याने व नागरीकांनी आरडा-ओरड सुरूच ठेवल्याने बिबट्या निसटल्याचे सूत्रांनी सांगितले.