बिबट्याला पिंजर्‍यात बंद न करता सोडले जंगलात

0

नवापूर । बिबट्याला पिंजर्‍यात बंद न करता सोडुन दिल्याची तक्रार मौजे धनराट आंबाफळी येथील ग्रामस्थ व शेतकरी यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे केली आहे. आज याबाबत नवापूरचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की 28 मार्च रोजी धनराट धुडीपाडा आंबाफळी येथे कालव्याचे पाईप मोरीमध्ये सकाळी नऊ वाजता बिबटया बसलेला असतांना वनविभाग चिंचपाडा यांना कळविण्यात आले. सदर वन अधिकारी जागेवर आले असतांना ग्रामस्थांनी विनंती केली. पंरतु वन विभागाने बिबट्याला पिंजर्‍यांत बंद न करता सोडुन दिले. त्यामुळे शेतकरी व गावकर्‍यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याने परिसरातील कुत्रेे,बकर्‍या, कोंबड्या फस्त केल्या आहेत. बिबट्यापासून गावकरी व शेतकरी यांची जिवीत हानी झाल्यास सर्वस्वी जबाबदारी ही वन विभाग यांची राहील निवेदनावर नवापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भरत गावीत, भानुदास गावीत, धूडीपाडा सरपंच अमेश गावीत, संदीप गावीत, किशोर गावीत, विलास गावीत, जयत गावीत, निलेश गावीत, अनिल गावीत राहूल गावीत आदिसह शेकडो ग्रामस्थ व शेतकरी यांचा सह्या आहेत. ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. प्रसंगी तहसीलदार प्रमोद वसावे यांच्याशी भरत गावीत यांनी सविस्तर चर्चा करून निवेदना संदर्भात माहिती दिली.

नवापूर तालुक्यामधील धनराट गावाचा जगलात आज सायंकाळी 18.30 ते19.30 वाजेचा कालावधीत बिबट्या दिसून आला आहे असे पोलीस प्रशासनाने कळविले आहे. बिबट्याला जगलात पळविण्यात आले असून परीसरात दहशतीचे वातावरण आहे. पिंजरा मागवून बिबट्याला जेरबद करावे अशी मागणी गावकर्यानी केली आहे अशी तातातडीने माहिती तहसीलदार प्रमोद वसावे यांनी सकाळीच प्रांतधिकारी यांना दिली होती. तसेच याबाबत उपाययोजना करण्याबाबत वन विभागाला कळवून गावातील परिस्थिती सांगितली होती.