बियरच्या बाटल्याची विना परवाना वाहतूक : 25 हजारांचा मद्यसाठा जप्त

0

संशयीत आरोपीसह रीक्षा भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात

भुसावळ- रीक्षातून विना परवाना बियरच्या बाटल्यांची वाहतूक होत असताना बाजारपेठ पोलिसांनी कारवाई करीत 25 हजारांच्या बिअरसह 75 हजारांची रीक्षा मिळून एक लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. कॉन्स्टेबल प्रशांत दिनकर चव्हाण यांनी याबाबत बाजारपेठ पोलिसात तक्रार दिली. रीक्षा (क्रमांक एम.एच.19 सी.डब्ल्यू.1597) ही एचडीएफसी बँकेकडून जात असताना ती थांबवल्यानंतर चालक शेख बिसमिल्ला शेख रहिम (43, जाम मोहल्ला, भुसावळ) यास बियर वाहतुकीचा परवाना व लायसन्सबाबत विचारणा केली असता संशयीताने कुठलीही माहिती न दिल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपीच्या ताब्यातून आरोपीच्या ताब्यून ट्युबर्ग कंपनीच्या 17 हजार 280 रुपये किंमतीच्या 108 बाटल्या, किंगफिशर कंपनीच्या तीन हजार 840 रुपये किंमतीच्या 24 बाटल्या, किंगफिशर कंपनीच्या एक हजार 752 रुपये किंमतीच्या छोट्या 12 बिअरच्या बाटल्या, कॅनन कंपनीच्या 996 रुपये किंमतीच्या 12 बाटल्या तसेच 75 हजार रुपये किंमतीची रीक्षा मिळून एक लाख आठ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 (फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.