बियाणी स्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

0

भुसावळ- राष्ट्रीय शिक्षा समिती संचालित बियाणी स्कुल (इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यम) मध्ये वार्षिक पारीतोषिक वितरण समारंभ उत्साहात झाला. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य आर.आर.सहानी होते. यावेळी बियाणी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी, सेक्रेटरी संगीता बियाणी, राजू पारीख, प्रवीणन भराडीया, डी.एम.पाटील, प्राचार्य यु.बी.निगम, सोफीया फ्रान्सीस उपस्थित होते. आर.आर.सहानी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना गौरविण्यात आले. सोफिया फ्रान्सिस यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात राघूकुल एज्युकेशन ट्रस्टतर्फे शाळेला आदर्श विद्यालय पुरस्कार तसेच प्राचार्य सोफिया फ्रान्सिस यांना कलागौरव पुरस्कार तसेच कलाशिक्षक नितीन अडकमोल यांना कलाभूषण हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तसेच दामिनी राजपूत, गायत्री आंबोडकर, प्रेरणा जैन,गायत्री चौधरी, काजल मेटकर यांनी सूत्रसंचालन केले तर यु.बी निगम यांनी आभार मानले.