बियाणे कंपनीकडून शेतकर्‍यांची फसवणूक

0

यावल। तालुक्यातील चुंचाळे येथील शेतकरी राजु काशिनाथ पाटील यांनी मौजे चुंचाळे शिवारातील गट क्रमांक 3 मध्ये एकूण क्षेत्र 0.94 हेक्टर क्षेत्रावर सदर शेतकर्‍यांने जळगाव येथील महाविर कृषी केद्रावरुन सिंजेटा कंपनीचा ‘शुगर 75’ मका यांची लागवड केली परंतु 25 ते 30 दिवसांनी त्या लावलेल्या मक्याला फुटवे फुटायला लागले. यासंदर्भात कृषी विभागाने पंचनामा केला असून 40 टक्के नुकसान झाले आहे.

शेतकर्‍यांचे 40 टक्के नुकसान झाल्याचे पंचनाम्यात केले नमूद
या शेतकर्‍याने त्वरीत महाविर कृषी केंद्राचे ललीत लोडाया यांना कळविले असता त्यांनी कंपनीचे सेल्समन रविद्र सपकाळे यांना पाठविले संबंधित सेल्समन यांनी राजु पाटील यांना शेतात आलेले फुटवे काढायचे सांगितले. त्यांनी चोपडा तालुक्यातील विष्णापुर येथील हाच मका लागवड केलेल्या शेतकर्‍यांशी तक्रारदार शेतकरी राजु पाटील यांचे बोलणे करुन दिले, मात्र तेथील शेतकर्‍यांनेही त्यांच्याही शेतात असेच फुटवे असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी यावल पंचायत समिती कृषी विभागाकडे लेखी तक्रार केली. 28 रोजी त्रिसदस्सीय समितीने प्रत्यक्ष शेतात येऊन पाहणी करुन त्यांनी अंदाजीत 40 टक्के नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमुद केले आहे. यावेळी जळगाव उपविभागीय कृषी अधिकारी गोरख लोखंडे, तालुका कृषी अधिकारी सी.जे.पाडवी, मंडळ कृषी अधिकारी व्हि.ई. पाटील, पंचायत समिती कृषी अधिकारी डी.पी. कोत, पाल कृषी विभागाचे शास्त्रज्ञ देशेट्टी, कंपनी प्रतिनीधी रविद्र सपकाळे, कृषी केद्र विक्रेता योगेश लोडाया, चुंचाळे पोलीस पाटील गणेश पाटील, शेतकरी राजु पाटील, संजय पाटील आदी उपस्थित होते.

चुंचाळे येथील शेतकरी राजु पाटील यांच्या तक्रार अर्जा नुसार त्रिसदस्सीय तक्रार समितीने शेतात पाहणी केली त्यात 40 टक्के पर्यंतचे नुकसान झालेले आहे. तसा पंचनामा करुन अहवाल दिला आहे. संबंधित सिजेटा कंपनीने नुकसान भरपाई द्यावी नाहीतर शेतकर्‍यांने ग्राहक मंचात जावुन न्याय मागावा असे जळगाव उपविभागीय कृषी अधिकारी गोरख लोखंडे यांनी सांगितले.

जिल्ह्यात जवळपास 2 हजार किलो सिजेटा कंपनीच्या मका शुगर 75 हा दिलेला आहे. बाकीच्या ठिकाणी तशी कोणतीही तक्रार नाही यांच्या शेतात नायट्रोजनचे प्रमाण जास्त झाल्याने फुटवे आले असावे असे सिजेटा कंपनीचे जिल्हा प्रतिनीधी रुपेश सांवत यांनी सांगितले.

कंपनीकडून शेतकर्‍यांना उर्मट वागणूक
सिजेटा कंपनीचा मका शुगर 75 हा लागवड केलेला आहे त्याला 30 दिवसांनी फुटवे फुटायला लागले तसे मी त्यांना कळवीले मात्र त्यांच्या प्रतिनीधीशी बोललो असता त्यांनी तुम्हाला कुठे तक्रार करायची असेल तेथे करा आमची कंपनी फार मोठी आहे तुम्ही आमचे काहिही करु शकत नाही अशी उर्मट भाषा त्यांनी वापरली नुकसान भरपाई न मिळाल्यास ग्राहक मंचात जाऊन न्याय मागु असे युवा शेतकरी राजु पाटील यांनी सांगितले.