चाकण : बिरदवडी (ता. खेड) येथील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून, फूस लावून, पळवून नेऊन बलात्कार केल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलास अटक केली आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक अर्चना दयाळ यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हि घटना 27 नोव्हेंबर 2017 रोजी घडली. आरोपी संतोष रतन जाधव ( वय 22, रा. अशोकनगर, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) याने साडे सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून रांजणगाव येथे पळवून नेवून भाड्याच्या खोलीत बलात्कार केला. पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्या तरुणावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.