औरंगाबाद । शहरात काही दिवसांपासून काही ठिकाणी कुत्र्यांचे कापलेले शीर सापडत आहेत आणि हे बिर्याणीत कुत्र्यांचं मांस वापरल्यामुळे होत असल्याचं वास्तव अॅनिमल वेलफेअर मंडळाच्या सदस्यांनी समोर आणलं आहे. शहरात अनेक ठिकाणी नाल्यात किंवा कचर्यात कुत्र्यांचे कापलेले शीर आढळून येत आहेत. मात्र धड आढळून येत नाही. रस्त्यावर मिळणार्या स्वस्त बिर्याणीत कुत्र्यांचं मांस सर्रास वापरलं जात असल्याने हे प्रकार होत असल्यायचं धक्कादायक वास्तव अधिकार्यांनी समोर आणलं. कुत्र्यांसोबत मांजरीचंही मांस वापरलं जात असल्याचा दावा अधिकार्यांनी केला आहे.
बिर्याणीत कुत्र्याचं मांस मिश्रण केलेलं असेल तर हानिकारक आहे. यामुळे सामान्यांचा जीव जाण्याची देखील शक्यता आहे. औरंगाबादेत मुकुंदवाडी, चिकलठाणा आणि पडेगाव भागांमध्ये कुत्र्यांचे कापलेले शीर आढळून आले. स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांनी हा प्रश्न उपस्थित केला. समितीच्या सदस्यांनी यातील वास्तव सांगितल्यावर आता महापालिका रस्त्यांवरील बिर्याणीच्या गाड्यांची तपासणी करणार आहे. अॅनिमल वेलफेअर मंडळाचे सदस्य औरंगाबादेत पाहणीसाठी आले होते.