जळगाव । जिल्हा परीषद शाळा बिलवाडी येथे जागतिक वसुंधरा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील उपशिक्षक संदिप पाटील यांनी यानिमित्त मार्गदर्शन केले. आज वसुंधरेचा मोठ्या प्रमाणावर र्हास होत आहे. ग्लोबल वॉर्मिंग यासारखी मोठी समस्या सर्वासमोर आहे. लोकांना अनेक पर्यावरणीय समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या सर्वांमागील महत्वाचे कारण म्हणजे मोठ्या प्रमाणावर होणारा पर्यावरणाचा र्हास प्रचंड वृक्षतोड, पाण्याचा गैरवापर, नद्यांमधून होणारा मोठ्या प्रमाणावरील वाळूचा उपसा या सर्व कारणांमुळे आपल्या पृथ्वीला धोका निर्माण झालेला आहे. यामुळे आपण या सर्व बाबतीत जागरुक राहायला हवे, या सर्व बाबींवर उपशिक्षक संदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
पाण्याचा सुयोग्य वापर करण्याचा संकल्प
वृक्षसंवर्धन करणे, पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपणा सर्वांची जबाबदारी व आपले कर्तव्य आहे. याची उदयाच्या भावी पिढीला जाणीव निर्माण व्हावी, यासाठी जागतिक वसुंधरा दिनानिमित्त संदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांकडून वृक्षसंवर्धन पाण्याचा सुयोग्य वापर याबाबतचा संकल्प करुन घेतला. वसुंधरा वाचेल तर आपण वाचू, पर्यावरणावरच आपले जीवनमान अवलंबून आहे. यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे. अशा शब्दात केंद्रप्रमुख राजेंद्र सपकाळे यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले. तसेच सामाजिक जाणीव जागृतीसाठी विद्यार्थ्यांना पर्यावरणाच्या माहितीसाठी उत्तम उपक्रम आयोजनाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, पालक व ग्रामस्थ यांनी संदीप पाटील यांचे कौतुक केले. याप्रसंगी मुख्याध्यापक सुकदेव पाटील, उपशिक्षक महेंद्र पाटील, विनोद नाईक यांचे सहकार्य लाभले.