जळगाव। महिला दिनाचे व 10 मार्च रोजी साजरा केल्या जाणार्या सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून बिलवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेळाव्यात युवतींना मतदान ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. तसेच गरीबीच्या परिस्थितीत परिस्थितीतही मुलींना शिकविणार्या महिलांचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी उपशिक्षक संदिप पाटील यांनी मुलींचे शिक्षण, स्त्री साक्षरता याविषयी मार्गदर्शन केले. ग्रामीण भागात महिला शिक्षण वाढावे यासाठी जनजागृतीपर कार्यक्रम यावेळी घेण्यात आला.
अध्यक्षस्थानी समुनबाई मराठे ह्या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून शाळे व्यवस्थापन समिती सदस्या आशाबाई वाघ उपस्थित होत्या. सुकदेव पाटील, महेंद्र पाटील, विनोद नाईक, अर्चना गोसावी यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. संदिप पाटील यांनी सूत्रसंचालन तर तारावंती नन्नवरे यांनी आभार मानले. गटशिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, केंद्रप्रमुख राजेंद्र सपकाळे यांनी शाळेतर्फे राबविल्या जाणार्या उपक्रमाचे कौतुक केले.