बिलवाडी- म्हसावद केंद्रस्तरीय शिक्षण परिषद जळगाव तालुक्यातील बिलवाडी जि.प. शाळेत म्हसावद समुह साधन केंद्रातर्फे 26 जूलै रोजी उत्साहात झाली. अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख राजेंद्र सपकाळे हे होते. शिक्षण परिषदेत विविध शालेय विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी अध्ययन स्थर निश्चिती संदर्भात कैलास ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.
नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे आवाहन
गटसाधन केंद्राचे विलास सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. शाळेत राबवायचे नवनवीन उपक्रम, मूल्यवर्धन उपक्रम, शालेय परिपत्रके, शासन निर्णय,या विषयांवर चर्चा करण्यात आली. रविंद्र काटे यांनी एबीएल पध्दत, ज्ञानरचनावाद या विषयावर सादरीकरण केले. बिलवाडी येथील ग्रेडेड मुख्याध्यापक कैलास पवार, बोरनार मुख्याध्यापक राजेंद्र पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते. बिलवाडी येथील शिक्षक प्रतिभा पेंढारे, प्रतिभा वानखेडे, नीता जोशी,अर्चना पाटील,अर्चना गोसावी,विनोद नाईक,संदिप पाटील यांनी व्यवस्थापन व नियोजन केले. शिक्षण परिषदेत म्हसावद बॉईज, म्हसावद कन्या, बोरनार, बिलवाडी, लमांजन, कुर्हाडदे, वाकडी, ज्ञानोदय विद्यालय, बोरनार माध्यमिक, म्हसावद माध्यमिक या शाळांतील 32 शिक्षक उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करतांना केंद्रप्रमुख राजेंद्र सपकाळे यांनी सांगितले की सर्व शिक्षकांनी मूलभूत वाचन क्षमता कार्यक्रम, ज्ञानरचनावाद, कृतीयुक्त अध्यापन यांच्या साहाय्याने अध्ययन अध्यापन प्रक्रिया दर्जेदार करावयाची आहे, तसेच विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम आयोजित करून शंभर टक्के विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्ता विकास करावा, असे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन निता जोशी यांनी तर आभार संदिप पाटील यांनी मानले.