बिलवाडी शाळेत जागतिक चिमणी दिनी मार्गदर्शन

0

जळगाव। येथून जवळच असलेल्या बिलवाडी येथील तालुका गटशिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने ‘जागतिक चिमणी दिवस’ उत्साहात साजरा झाला. प्रगत शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत जळगाव तालुक्यात गटशिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्या मार्गदर्शनात विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकासासाठी विविध उपक्रम सतत राबविले जात आहेत. यामुळेच विद्यार्थ्यांमध्ये भुतस्था या मुल्याची रुजवणूक होण्यासाठी उपशिक्षक संदीप पाटील यांनी नियोजन केले.

उन्हाळ्यात पक्षांना पाण्याची केली व्यवस्था
यामुळे उन्हाळ्यात पक्ष्यांना पाण्याची व्यवस्था होणार आहे. तसेच धान्याचे दाणे सुद्धा या भांड्यांमध्ये ठेवता येतील. घरातील टाकाऊ वस्तूंपासून टिकावू वस्तू तयार करण्याचे प्रात्यासिक यानिमित्ताने विद्यार्थ्यांना मिळाले. संदीप पाटील यांच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्राणी, पक्षांविषयी प्रेमाची भावना निर्माण होईल. तसेच भुतद्या मुल्याची रुजवणूक होईल अशी भावना शिक्षण विस्तार अधिकारी रविकिरण बिर्‍हाडे यांनी व्यक्त केली. प्र.मुख्याध्यापक सुकदेव पाटील, शा.व्य. समिती अध्यक्ष, सदस्य व पालकांनी उपक्रमाचे कौतुक केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये प्राणी, पक्ष्यांबद्दल प्रेम, वात्सल्याची भावना निर्माण होणे आवश्यक आहे. आपल्या सभोवतालच्या सजिवांची काळजी घेणे ही आपलीच जबाबदारी आहे.