चाळीसगाव : तालुक्यातील बिलाखेड येथे रयत सेना शाखेचे उद्घाटन नुकतेच रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांच्याहस्ते करण्यात आली असून बिलाखेड शाखेची कार्यकारिणी यावेळी घोषित करण्यात आली. चाळीसगाव तालुक्यात रयत सेनेची विविध क्षेत्रात योगदान करत आहे. यात सेनेच्या माध्यमातुन सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य या क्षेत्रात भरीव कार्य केले तसेच गरजु विद्यार्थ्याना शालेय साहित्य वाटप जागतिक महिला दिनी मोफत आरोग्य शिबीर, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुंटुंबाना आर्थिक मदत, तालुक्यातील गिरणा काटी असलेल्या 22 खेड्यातील 4 ते 5 हजार शेतकर्याच्या सातबारा उतारावरील असलेला बोजा कमी करण्यास मोठे योगदान, मोफत आधार कार्ड नोंदणी, विद्यार्थी करीयर कार्यशाळेचे आयोजन, हुतात्मा एक्सप्रेसच्या थांब्यासाठी पाठपुरावा, अपघातग्रस्थांना तातळीची मदत, शालेय विद्याथ्यार्ंना विविध दाखले वाटप, शिवाजी स्मारकासाठी आंदोलनात सहभाग, रक्तदान शिबीर, अरोग्य शिबीर, महिलांचा सन्मान यांच्यासह अनेक सामाजिक कार्यात रयत सेना नेहमी अग्रेसर असून सर्व सामन्य रयतेच्या हक्कासाठी संघटना यापुढे कार्य करणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी उद्घाटन प्रसंगी केले.
यशस्वितेसाठी यांचे परीश्रम
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिक्षक सेना तालुकाध्यक्ष ए.बी. पाटील यांनी केले तर आभार शिक्षक सेना कार्याध्यक्ष दिपक चव्हाण यांनी मानले. यावेळी प्रदेश संघटक पप्पु पाटील, प्रदेश सचिव प्रमोद वाघ, प्रदेश समन्वयक पी.एन. पाटील, शेतकरी सेना तालुकाध्यक्ष दिपक राजपुत, रयत सेना तालुकाध्यक्ष बंटी पाटील, तालुका कार्याध्यक्ष भूषण पाटील, उपाध्यक्ष मुकुंद पवार, भरत नवले, विद्यार्थी तालुकाध्यक्ष सप्निल गायकवाड, शहरउपाध्यक्ष शुभम देशमुख, प्रंशात अजबे, राजेंद्र देठे, भाऊसाहेब सोमवंशी, दिनेश पाटील, बाळु मुलमुले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी तालुका उपाध्यक्ष अनिल पाटील, प्रभाकर पाटील, प्रभाकर शेलार, पुंडलिक शेलार यांनी परीश्रम घेतले.