साकूरात शार्प शुटर तैनात, तीन मचाण उभारल्या
जळगाव: सात जणांचा बळी घेणार्या नरभक्षक बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाने कंबर कसली आहे. साकूर येथे बालकाचा बळी घेतल्यानंतर वनविभागाने येथे तीन मचाण उभारल्या आहेत तर ग्रामस्थांच्या मदतीसाठी शार्प शुटर तैनात केल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, तालुक्यातील बिलाखेड शिवारात हिंस्त्र प्राण्याने एका मेंढीचा फडशा पाडला मात्र हा हल्ला बिबट्याने केला नसल्याची माहिती वनपरीक्षेत्र अधिकारी संजय मोरे यांनी दिली. ते म्हणाले की, कालपासून आम्ही साकूर व परीसर पिंजून काढला असून ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.