शहादा – तालुक्यातील बिलाडी येथील पुरूषोत्तम नंद्राम पाटील या शेतकर्याच्या घराच्या पाठीमागे रात्री 9 फुटाचा अजगर आढळून आला. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अखेर ग्रामस्थांनी गावानजिक असलेल्या ससदे येथील सर्प मित्र उमेश कोळी यांना बोलवून मोठ्या कसरतीने अजगराला पकडण्यात यश आले. रात्रीच शहादा येथील वनविभागाचे वनपाल अनिल बरुडे, नीम मिर्झा यांच्याताब्यात दिले असुन सर्प मिञ उमेश कोळी सोबत वनविभागाच्या अधिकार्यांंनी मानमोडगयाच्या जंगलात रात्री 11 वाजेच्या सुमारास सोडण्यात आले. या अजगराला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.