नंदुरबार । जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्हास्तरीय वनहक्क समितीच्या बैठकीत वनसिंग राशा पटले आणि इतर 20 व्यक्तिंच्या वनहक्क दाव्यांची पडताळणी करून त्यांना मंजुरी देण्यात आली. एक दावा नामंजूर करण्यात आला.
बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, प्रकल्प अधिकारी जितेंद्र डुडी, उपवनसंरक्षक एस.बी.केवटे, अनिल थोरात आणि अशासकीय सदस्य सरवरसिंग वेच्या नाईक उपस्थित होते.
एका जनहित याचिकेवर निर्णय देतोना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 30 जानेवारी 2019 रोजी जिल्हास्तरीय वनहक्क समितीला वनसिंग राशा पटले आणि इतर 21 व्यक्तिंच्या वनहक्क दाव्याबाबत चार महिन्यात निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी मंजुळे यांच्या उपस्थितीत 23 मार्च रोजी झालेल्या सुनावणीत दाव्यांची पुर्नपडताळणी करण्याचे निर्देश उपविभागस्तरीय समितीस देण्यात आले होते.
तळोदा उपविभागस्तरीय वनहक्क समितीने दाव्यांची पुर्नपडताळणी करून दावे जिल्हास्तरीय समितीकडे अंतिम निर्णयासाठी सादर केले होते. त्यावर जिल्हास्तरीय समितीची बैठक घेण्यात येऊन 21 वनहक्क दाव्यांना मंजुरी देण्यात आली.
Prev Post
Next Post