तळेगाव दाभाडे : बिल्डर्स असोेसिएशन ऑफ इंडिया पुणे शाखेवर 2017-2018 या आर्थिक वर्षाकरिता चेअरमनपदी जगन्नाथ जाधव यांची निवड करण्यात आली. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया ही बांधकाम व्यवसायातील अग्रगण्य संस्था असून तिचा विस्तार देशभर आहे. या संस्थेची स्थापना सन 1941 साली ब्रिटीश अधिकारी ब्रिगेडियर जँकसन यांनी केली. सरकारी यंत्रणा व कुशल अभियंता यांचा समन्वय साधणारी संस्था आहे. यामध्ये 2017-2018 या आर्थिक वर्षाकरिता कार्यकारिणी पुढील प्रमाणे : व्हाईस चेअरमन प्रदीप गर्गे, मानद सचिव मनोज देशमुख तर मानद खजिनदार म्हणून सुनील मते हे काम पाहतात.