रांची : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यात दोषी ठरलेले व सध्या जामिनावर असलेले लालूजीना झारखंड उच्च न्यायालयानं आणखी एक झटका दिला आहे. वैद्यकीय कारणास्तव जमीन वाढवून मिळवण्याचा त्यांचा अर्ज न्यायालयानं फेटाळून लावला आहे. तसंच, येत्या ३० ऑगस्टपर्यंत शरण येण्याचे आदेश दिले आहेत.
जामिनाची मुदत २० ऑगस्ट रोजी संपली होती . ती आणखी तीन महिन्यांनी वाढवावी, अशी विनंती लालूंच्या वतीनं करण्यात आली होती. मात्र, न्यायालयानं ही विनंती फेटाळून लावली. त्यामुळं आता लालूंना पुन्हा रांची येथील रुग्णालयात हलवण्यात येणार आहे, असं त्यांच्या वकिलांनी सांगितलं.