बिहारचे सिंघम लांडेंची मुंबई धडाकेबाज कारवाई

0

नागपूर । मराठमोळे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी बिहारमध्ये दंबग अधिकारी म्हणून एक ओळख निर्माण केली होती. त्यांची काही दिवसांपुर्वीच मुंबईत या अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात आली .मुंबईत अंमली पदार्थ विरोधी पथक पोलीस उपायुक्तनियुक्ती करण्यात आल्यानंतर शिवदीप लांडे यांनी आपली धडाकेबाज कारवाई सुरु केली आहे. लांडे यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांनी पहिलीच कारवाई केली आहे. मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एक किलोचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. अंमली पदार्थांची तस्करी करणार्‍या 12 नायजेरियन तरुणांना अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे.