पिंपरी-चिंचवड : बिहार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे शेकडो लोकांचा जीवदेखील गेला आहे. लाखो लोक नैसर्गिक आपत्तीचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत भोजपुरी चित्रपटसृष्टीने पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. प्रसिद्ध भोजपुरी चित्रपट निर्माते प्रेम राय, सुपरस्टार पवन सिंह आणि अभय सिन्हा यांनी बिहार राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 11 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाचे सर्वस्तरातून कौतूक केले जात आहे. भोजपुरी चित्रपट ‘सैय्या सुपरस्टार’च्या सेटवर ही घोषणा करण्यात आली. याप्रसंगी सुपरस्टार पवन सिंह यांच्या वडिलांनादेखील श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते, निर्देशक, कलाकारांची मोठी उपस्थिती होती.
आम्ही पूरग्रस्तांच्या पाठीशी
याप्रसंगी सुपरस्टार पवन सिंह व चित्रपट निर्माते प्रेम राय यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, संकटाच्या काळात जर आपण कोणाच्या मदतीला आलो नाही तर, ही आपल्यासाठी मोठी शरमेची बाब आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बिहार राज्यातील लोकांवर संकट कोसळले आहे. अशा परिस्थितीत त्यांना मदत करणे आपले कर्तव्य आहे. आम्ही सारे जण पूरग्रस्तांच्या पाठीशी आहोत. त्यामुळे संकटामुळे खचून न जाता, पूरग्रस्तांनी धीराने या परिस्थितीला तोंड द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. पवन सिंह म्हणाले, मीदेखील माझ्या वडिलांना गमावले आहे. आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावण्याचे दु:ख काय असते, हे मी अनुभवले आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीत ज्यांनी आपल्या लोकांना गमावले आहे; त्यांचे दु:ख मी समजू शकतो, असे मत सिंह यांनी व्यक्त केले.
‘सैय्या सुपरस्टार’च्या शुटींगला प्रारंभ
‘सैय्या सुपरस्टार’ या भोजपुरी चित्रपटाच्या शुटींगला प्रारंभ झाला आहे. या चित्रपटात सुपरस्टार पवन सिंह नव्या भूमिकेत आहेत. चित्रपटाचे निर्माता प्रेम राय व निर्देशक अजय कुमार आहेत. तर को-प्रोड्यूसर नीरज शर्मा आणि प्रचारक संजय भूषण पटियाला आहेत. मनोज मतलबी यांनी गीतलेखन केले आहे. अविनाश झा घुंघरू यांचे संगीत आहे. छायांकन फिरोज खां, नृत्य निर्देशन कानू मुखर्जी व रामदेवन, कला अंजनी तिवारी, प्रोडक्शन कंट्रोलर राकेश सिंह, सह निर्माता नीरज शर्मा, एक्सक्युटिव्ह प्रोड्यूसर निशांत सिंह, लेखक धनंजय कुमार आहेत.
हे आहेत मुख्य कलाकार
या चित्रपटात पवन सिंह, अक्षरा सिंह, अरविन्द अकेला कल्लू, शिखा चौधरी, संजय पाण्डेय, संजय यादव, राज प्रेमी, ब्रजेश त्रिपाठी, संजय वर्मा, अभय राय, रश्मी शर्मा, इला पाण्डेय, दिव्या सिंह, निरंजन चौबे, कमलाकांत मिश्रा, एसएस द्विवेदी, सोनी पटेल, जमील सिद्दिकी, सिवेश तिवारी, सोनी झा, आरती श्रीवास्तव, जफर खान, ललित भंडारी, सलीम सुधाकर, सकीला मजिद, परी, नेहा सिंह, कोमल झा, धामा वर्मा हे मुख्य कलाकार आहेत.