नवी दिल्ली: बिहारमधील भाजपप्रणीत एनडीएच्या लोकसभेच्या जागा वाटपावर आज बैठक झाली. यात भाजपला १७, जनता दल (युनायटेड) १७ आणि लोक जनशक्ती पार्टीला ६ जागेवर उमेदवार देण्याचे ठरले. बैठकीनंतर याची घोषणा करण्यात आली. बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार, लोजपा सुप्रीमो रामविलास पासवान व चिराग पासवान यांची उपस्थिती होती.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष आतापासून तयारीला लागले आहे. त्यामुळे जागावाटपावर चर्चा होत आहे.