पटना-आज देशभरात भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम होत आहे. त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. दरम्यान बिहारमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचा पुतळा उभारणार असल्याची घोषणा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली. ठिकाण अद्याप निश्चित नाही, मात्र लवकरच ठिकाण निश्चित केले जाणार आहे.
पटनामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी नितीश कुमार बोलत होते. देशातील राष्ट्रीय एकता अबाधित राहावी यासाठी वाजपेयी यांनी नेहमी प्रयत्न केले असून त्यांची स्मृती कायम राहावी यासाठी पुतळा उभारला जाणार आहे.