रोहतास : बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील नौहट्टा परिसरातील बीघा व टीपा गावात सात ते आठ ठिकाणी अतिरेकी संघटना ईसिस (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅन्ड सीरिया)चे पोस्टर लावण्यात आले होते. या घटनेमुळे सर्वत्र खळबख उडाली आहे. इंग्रजी आणि उर्दू भाषेत असलेल्या पोस्टरमधून युवकांना ईसिस या अतिरेकी संघटनेत सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
ईसिसच्या अभियान फोटोसह आयएसआयएस ट्रेल ऑफ टेरर व पोस्टरच्या मध्यभागी फोटो तर बाजूला उर्दूमध्ये कलमा व खालच्या भागात इंग्रजीमध्ये, नवीन भारतीय मुलांनी संघटनेत सहभागी व्हावे. ईसिस बिहारच्या सर्व जिल्ह्यात आहे, अशा आशयाचा मजकूर लिहीला आहे.
शनिवारी सकाळी ही पोस्टर्स सर्वत्र दिसताच खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने सिक्रोली बीघा व टीपा या गावात सुमारे सात ते आठ ठिकाणी लावलेले हे पोस्टर्स काढून टाकले. याबाबत पोलिस संचालकांनी सांगितले की, अशा प्रकारे रोहतासमध्ये ईसिसचे पोस्टर्स लावले गेले ही बाब गंभीर आहे. रोहतासच्या पोलिस अधिक्षकांकडून घटनेची चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, रोहतासच्या पोलिस अधिक्षकांनी सांगितले की, कुणीतरी मुद्दामही अशा प्रकारचे कृत्य केले असण्याची शक्यता आहे. घटनेची पोलिस कसून चौकशी करत आहेत.