बिहारमध्ये एकाच कुटुंबातील १६ जणांवर अ‍ॅसिड हल्ला !

0

पाटना: बिहारमध्ये एकाच कुटुंबातील १६ जणांवर अ‍ॅसिड हल्ला झाल्याची धक्कायदाक घटना समोर आली आहे. कुटुंबातील तरुणीची गावातील काही तरुणांकडून वारंवार छेड काढली जात होती. सदस्यांनी याला विरोध केला असता त्यांच्यावर अ‍ॅसिड हल्ला करण्यात आला. वैशाली जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

आज बुधवारी सकाळी काही लोक जबरदस्तीने नंदकिशोर यांच्या घरात घसुले आणि अ‍ॅसिडने कुटुंबातील सदस्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात आठ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. पोलिसांनी याप्रकऱणी पाच जणांना अटक केली आहे.