बिहारमध्ये पावसात २२ जणांचा मृत्यू

0

पटणा – बिहारमधील अनेक जिल्ह्यात जोरदार पावसासह विजा कोसळल्या. यात २२ जणांचा मृत्यू झाला आहे. सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना ४-४ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. राज्य आपत्ती निवारण मंचानुसार, सहरसा येथे सर्वाधिक ६, दरभंगा येथे ५, तर कैमूर येथे ३ जणांचा वीज पडून मृत्यू झाला. याच बरोबर, मधेपुरा, भागलपूर, औरंगाबाद, रोहतास, गया, बक्सर, मोतिहारी आणि खगडिया येथे प्रत्येकी १-१ जणांचा मृत्यू झाला. बिहारमध्ये शुक्रवारी सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी वादळदेखील पाहायला मिळाले. हवामान खात्याने यापूर्वीच याचा अंदाज वर्तवला होता.